ब्राह्मण युवक व युवतींनी जास्तीत जास्त उद्योग/ व्यवसायामधे उतरावे तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करीण्याकरीता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ब्राह्मण १ फेब्रुवारी २०१५ रोजी शिर्डी येथेयुवांसाठी व्यवसाय व रोजगार मेळावा घेत आहे.
सद्यस्थितीत कोणता व्यवसाय करता येईल. असलेला व्यवसाय कसा वाढविता येईल इत्यादी चे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच काही कंपन्या इथे इटरव्हु घेणार आहेत.
तरी जास्तीत जास्त युवक व युवतींनी याचा लाभ घ्यावा. युवांनी आपली माहीती आधी कळवावी त्याप्रमाणे नियोजन करण्यात येईल. त्यासाठीचे फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे. हे फॉर्मस वेबसाईटवर आहेत तसेच जिल्हा प्रतिनिधीकडुन देखील मिळतील. ते भरुन लवकरात लवकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रतीनिधी कडे द्यावेत.
या मेळाव्याचा फायदा उच्चशिक्षीतां प्रमाणेच कमी व अत्यल्प शिक्षीत युवांना व्हावा या दॄष्टीने चालु आहेत.
सर्वच युवांनी आपली माहिती (फॉर्म) महासंघाच्या प्रतीनिधीकडे द्यावेत. समाजासाठी एक पाउल पुढे येउन आपल्या समाजातील जास्तीतजास्त युवांपर्येंत पोहोचुन त्यांनाही मेळाव्याची माहिती द्यावी. तुमच्या मुळे कदाचीत एखाद्या तरुणाला नोकरी वा व्यवसायाची संधी उपलब्ध होईल.
तरी सहकार्य करावे ही विनंती.
धन्यवाद |